Yantra India Ltd Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण यंत्र इंडिया लिमिटेड येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती घेणार आहोत. यंत्र इंडिया लिमिटेड या संस्थे कडून एकूण 4039 रिक्त जागांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता यंत्र इंडिया लिमिटेड द्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून देण्यात आलेली नाही. लवकरच अर्ज करण्याची शेवटची तारीख संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरती करिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरती मधून 4039 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरती मधून ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Yantra India Ltd Bharti 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटी खालीलप्रमाणे.
- नॉन – ITI अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा सर्व विषयांमध्ये मिळून 50% गुणाने किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. गणित आणि विज्ञान विषयामध्ये प्रत्येकी 40% किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण केलेले असावे.
- ITI अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून ITI उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराने आयटीआय अर्ज जमा करण्याच्या शेवटच्या तारखेत अगोदर पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- अप्रेंटिस या पदासाठी काम करण्याकरिता वय कमीत कमी 14 वर्षे पूर्ण असावे लागते. धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या अप्रेंटिस उमेदवारांकरिता वयाची अट कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे अशी आहे. अप्रेंटिस कायदा 1961 नुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची जास्तीत जास्त वय 35 वर्षे आहे.
- अप्रेंटिस या पदासाठी काम करण्याकरिता वय कमीत कमी 14 वर्षे पूर्ण असावे लागते. धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या अप्रेंटिस उमेदवारांकरिता वयाची अट कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे अशी आहे. अप्रेंटिस कायदा 1961 नुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची जास्तीत जास्त वय 35 वर्षे आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारा करिता वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल. SC/ ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
- अप्रेंटिस या पदासाठी पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
- अप्रेंटिस या पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ₹ 200 परीक्षा शुल्क असेल. SC / ST / PWD / महिला / ट्रान्स जेंडर या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 100 रुपये असेल.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी यंत्र इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचे वाचन करावे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी उमेदवारांनी येथे क्लिक करा.
Yantra India Ltd Bharti 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- सदरील भरती Yantra India Ltd Bharti 2024 करिता अर्ज करण्याचा ऑनलाइन पर्याय यंत्र इंडिया लिमिटेड द्वारे देण्यात आलेला आहे.
- यंत्र इंडिया लिमिटेड यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी यंत्र इंडिया द्वारे उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना उमेदवारांनी आपली संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरायचे आहे. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूक झाल्यावर कोणत्याही टप्प्यावर अर्ज बाद केला जाऊ शकतो. अर्जात झाल्यानंतर याला पूर्ण पुणे उमेदवार जबाबदार असणार आहे.
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून देण्यात आलेली नाही.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी Yantra India Ltd Bharti 2024 अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.
Yantra India Ltd Bharti 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील अप्रेंटिस भरती Yantra India Ltd Bharti 2024 साठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. असे उमेदवारच पात्र ठरतील.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील अप्रेंटिस भरती साठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अप्रेंटिस पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरती साठी परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवाराकडे हॉल तिकीट असणे गरजेचे आहे. सदरील भरतीसाठी परीक्षा केंद्र ठरवण्याचे काम यंत्र इंडिया लिमिटेड द्वारे करण्यात येणार आहे.
- अप्रेंटिस पदासाठी Yantra India Ltd Bharti 2024 आवश्यक माहिती यंत्र इंडियाच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
Yantra India Ltd Bharti 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- यंत्र इंडिया लिमिटेड, अंबाझरी, नागपुर यांच्याकडून सदरील भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- भारतीय आयुध निर्माण कारखान्यांमध्ये अप्रेंटिस पदासाठी Yantra India Ltd Bharti 2024 या भरती मधून पदे भरली जाणार आहेत.
- भारतीय नागरिक असणाऱ्या उमेदवारांमधून सदरील भरतीसाठी 58 क्रमांकाची बॅच भरली जाणार आहे.
- भारतीय आयुध निर्मिती कारखाना मध्ये संपूर्ण भारतामध्ये अप्रेंटिस पदाकरिता उमेदवारांची निवड करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- स्किल इंडिया मिशन प्रमोट करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेली आहे.
- ज्या उमेदवारांनी भारत सरकारच्या अप्रेंटिस वेबसाईट द्वारे अर्ज केलेला आहे. आशा उमेदवारांना यंत्र इंडिया लिमिटेड च्या वेबसाईट वरून पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे.
- Yantra India Ltd Bharti 2024 ऑक्टोबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- ज्या उमेदवारांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या http://www.apprenticeship.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे अर्ज केलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा यंत्र इंडिया लिमिटेड संकेतस्थळाद्वारे अर्ज करावा लागणार आहे. https://www.yantraindia.co.in/. ही यंत्र इंडिया लिमिटेड यांची अधिकृत संकेतस्थळ आहे.
- यंत्र इंडिया लिमिटेड त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली वेळापत्रक, हॉल तिकीट आणि इतर सर्व अपडेट्स यावर उमेदवारांनी विश्वास ठेवावा. यंत्र इंडिया लिमिटेड इतर कोणत्याही मार्गाने भरती संदर्भातील माहिती प्रसिद्ध करत नाही.
Yantra India Ltd Bharti 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे
- भारत देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणारी यंत्र इंडिया लिमिटेड ही संस्था आहे.
- यंत्र इंडिया लिमिटेड या संस्थेचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे.
- यंत्र इंडिया लिमिटेड ही एक पब्लिक सेक्टर मधील कंपनी आहे.
- भारतीय सैन्याला शस्त्र, स्फोटके, आर्टिलरी, काडतूस पुरवण्यासाठी यंत्र इंडिया लिमिटेड ही संस्था काम करते.
- यंत्र इंडिया लिमिटेड या संस्थेच्या भारतामध्ये एकूण आयुध निर्माण करणाऱ्या सात शाखा आहेत.
- ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, ऑर्डनन्स फॅक्टरी डम डम, ऑर्गनाइज फॅक्टरी कटनी, ऑर्डनन्स फॅक्टरी मुराद नगर, ऑर्गन फॅक्टरी ईशापुर, ऑर्डनन्स फॅक्टरी जबलपुर हे कारखाने यंत्र इंडिया लिमिटेड द्वारे चालवले जातात.
- यंत्र इंडिया लिमिटेड या संस्थेची स्थापना 1 ऑक्टोबर 2019 रोजी झालेली आहे.
- यंत्र इंडिया लिमिटेड या संस्थेचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गुरुदत्त राय हे आहेत.
- यंत्र इंडिया लिमिटेड या संस्थेचे ऑपरेशन डायरेक्टर शरद यादव हे आहेत.
- यंत्र इंडिया लिमिटेड या संस्थेचे फायनान्स डायरेक्टर राकेश सिंग लाल हे आहेत.
- यंत्र इंडिया लिमिटेड ही संस्था भारत सरकारच्या मालकीची आहे.
Yantra India Ltd Bharti 2024 | अप्रेंटिस पदा संदर्भात माहिती खालील प्रमाणे
- नवीन पिढीतील तरुणांना संबंधीत क्षेत्रातील ऑन फिल्ड प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेला अप्रेंटिस शिप असे म्हणतात.
- काही अप्रेंटिस प्रोग्राम मध्ये ऑन फिल्ड जॉब सोबतच क्लास रूम मधील वर्क आणि वाचन यासंदर्भात ऍक्टिव्हिटीज सुद्धा दिल्या जातात.
- अप्रेंटिस शिप ही ठराविक कालावधीसाठी असते. या कालावधीमध्ये उमेदवाराला त्याच्या क्षेत्रामध्ये पारंगत होण्यात मदत होते.
- प्रत्येक संस्थेमध्ये दरवर्षी नवीन अप्रेंटिस उमेदवारांना संधी देण्यात येते. त्याचप्रमाणे त्या संस्थेला स्वतःचे टास्क पूर्ण करण्यास सुद्धा मदत होते.
- अप्रेंटिस म्हणून काम करणाऱ्या उमेदवाराला भारत सरकारच्या नियमानुसार ठराविक मानधन देण्यात येते.
- अप्रेंटिस शिप चे मूळ दोन प्रकार पडतात. त्यामध्ये इंडिपेंडेंट आणि को-ऑपरेटिव्ह असे दोन प्रकार पडतात.
- उमेदवार शिकत असणाऱ्या संस्थेचा काही संबंध नसताना किंवा ज्या काळामध्ये उमेदवाराचा संबंधित शाखेच्या शैक्षणिक कामामध्ये काहीही संबंध नसतो. अशा वेळेस अप्रेंटिस शिप प्रोव्हाइड करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून जी अप्रेंटिसशिप उमेदवाराला देण्यात येते. आशा अप्रेंटिसशिपला इंडिपेंडेंट अप्रेंटिस शिप असे म्हणतात.
- शैक्षणिक संस्था आणि अप्रेंटिसशिप प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनी या दोघांच्या संलग्नतून नवीन उमेदवाराला जी अप्रेंटिस शिप देण्यात येते त्याला को-ऑपरेटिव्ह अप्रेंटिस शिप असे म्हणतात.
- सदरील अप्रेंटिस शिप ही कंत्राटी तत्त्वावर अवलंबून असते. यामध्ये उमेदवाराच्या पालकाची परवानगी असणे आवश्यक असते.