RITES Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण RITES लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या जाहिराती संबंधात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ टीम लीडर, डिझाईन तज्ञ, निवासी अभियंता, साईट अभियंता, साईट सर्वेअर, विभाग अभियंता, डिझायन अभियंता ‘ या पदांकरिता सदरील भरती मधून योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत. सदरील भरती मधून योग्य उमेदवार निवडण्याकरीता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 23 ते 25 ऑक्टोबर 2024 या तारखे दरम्यान मुलाखतीचे आयोजन केलेले आहे. RITES लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात वाचावी किंवा खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 28 जागांकरिता RITES लिमिटेड यांच्याकडून भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
- RITES लिमिटेड येथील भरती मधून ‘ टीम लीडर, डिझाईन तज्ञ, निवासी अभियंता, साईट अभियंता, साईट सर्वेयर, विभागात अभियंता, डिझाईन अभियंता’ या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय भरती
RITES Bharti 2024 | RITES लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.
- सदरील RITES Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संस्थे कडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर- www.rites.com या संकेत स्थळाला भेट देऊन करियर सेक्शन वरती जाऊन संपूर्ण माहिती पाहायची आहे.
- ड्रॉइंग इंजिनियर / डिझाईन इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल या शाखेमधून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. किंवा उमेदवारांनी सदरील शाखेमधून डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांनी डिझायनिंग रेल्वे सिग्नल यामध्ये चार वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. डिप्लोमा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांनी डिझायनिंग रेल्वे सिग्नल यामध्ये सात वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- क्वालिटी कंट्रोल इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वॉटर सप्लाय प्रोजेक्ट / सेवर एज / वेस्ट वॉटर / इरिगेशन यामध्ये कामाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- सदरील RITES Bharti 2024 भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- ‘ RITES कार्यालय – नवी मुंबई, अहमदाबाद, गुरुग्राम ‘ या ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
- सदरील भरती मधून इंजिनीयर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 55 वर्षाची आहे.
- टीम लीडर या पदासाठी एक जागा रिक्त आहे. डिझाईन तज्ञ या पदासाठी चार जागा रिक्त आहेत. निवासी अभियंता या पदासाठी चार जागा रिक्त आहेत. साईट अभियंता या पदासाठी एकूण 10 जागा रिक्त आहेत. साईट सर्वेयर या पदासाठी एकूण पाच जागा रिक्त आहेत. विभागात या पदासाठी एकूण दोन जागा रिक्त आहेत. डिझाईन अभियंता या पदासाठी एकूण दोन जागा रिक्त आहे.
- कॉलिटी कंट्रोल इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 45 वर्षांपर्यंत आहे.
- कॉलिटी कंट्रोल इंजिनियर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 70 हजार रुपये वेतन मिळणार आहे.
- जनरल मॅनेजर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचा कालावधी तीन वर्षाचा असेल. या पदाकरिता वय मर्यादा 55 वर्षापर्यंत असेल.
RITES Bharti 2024 | RITES लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- RITES लिमिटेड येथील RITES Bharti 2024 भरती मधून योग्य उमेदवार थेट मुलाखती द्वारे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी भरलेल्या अर्जात एक मुलाखतीला येताना सोबत आणायचे आहेत.
- ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने मुलाखतीच्या अगोदर अर्ज करण्याची सुविधा RITES लिमिटेड या संस्थे कडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी अशा प्रकारे अर्ज करू नये.
- मुलाखतीला येणाऱ्या सर्व उमेदवारांनी शिस्तीचे पालन करायचे आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी फॉर्मल ड्रेस मध्ये येणे गरजेचे आहे.
- 23 ते 25 ऑक्टोबर 2024 या तारखे दरम्यान पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
- सदरील RITES Bharti 2024 भरती संदर्भात जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात आलेली आहे. ती जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. भरतीतील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता www.rites.com या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
RITES Bharti 2024 | RITES लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहेत.
- RITES लिमिटेड येथील भरतीसाठी मुलाखतीला उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना मधूनच योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इतर कोणत्याही उमेदवाराला मुलाखत न देता पदावर नियुक्त करता येणार नाही.
- सदरील RITES Bharti 2024 भरतीच्या मुलाखतीसाठी जाहिरातीत देण्यात आलेल्या ठिकाणी येण्याकरिता उमेदवारांना RITES लिमिटेड यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
- RITES लिमिटेड यांच्या मुलाखती दरम्यान कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- RITES लिमिटेड यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
RITES Bharti 2024 | RITES लिमिटेड यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- भारतीय रेल्वेला अभियांत्रिकी सेवा देणारी RITES लिमिटेड हीच एक संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1978 रोजी करण्यात आलेली होती. भारतीय रेल्वेच्या मालकीची असणारी RITES लिमिटेड ही एक संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय गुडगाव, हरियाणा या ठिकाणी आहे.
- RITES लिमिटेड या संस्थेच्या प्रमुख सेवा म्हणजे रेल्वे सेवांना सल्ला देणे, प्रकल्पाचे व्यवस्थापन करणे, ऊर्जा व्यवस्थापन, बंधारे आणि हवाई सेवा या प्रमुख सेवा आहेत.
- RITES लिमिटेड या संस्थेचा आयपीओ ज्यावेळेस शेअर मार्केट मध्ये आलेला होता त्यावेळेस या आयपीओ ला लोकांची पसंती मिळालेली होती. या कंपनीने शेअर बाजारात प्रवेश केल्यामुळे कंपनीला खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा झालेला आहे. कोणतेही नवीन प्रकल्प उभा करत असताना ही संस्था पर्यावरणाचा काळजीपूर्वक विचार करत असते.
- रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांमध्ये RITES लिमिटेड या संस्थेद्वारे महत्त्वाची भूमिका बजावण्यात आलेली आहे. बंदर आणि लॉजिस्टिक सेवांमध्ये या कंपनीचे महत्त्वाचे काम आहे. रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांमध्ये त्यांच्याद्वारे महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या संस्थेद्वारे उभा करण्यात आलेले सर्व प्रकल्प ऊर्जा आणि पर्यावरण यांना हानी न पोहोचवता किंवा कमी हानी पोहोचवता तयार करण्यात आलेले असतात. या संस्थेमधून रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये कशाप्रकारे कमी ऊर्जा वापरण्यात येईल याचे नियोजन केलेले असते. RITES लिमिटेड या संस्थेने बजावलेल्या कामगिरीबद्दल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या संस्थेला पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
- RITES Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी देण्यात आलेल्या पात्रतेची आणि अटींची पूर्तता होत असेल तरच भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
- ज्यावेळेस उमेदवार सदरील भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असतात अशा वेळेस उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर तयार होऊन ऑनलाइन फॉर्म च्या सुरुवातीला प्रिंट झालेला असतो.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःच्या ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक ते कागदपत्र अर्जासोबत जोडायचे आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी सोबत सर्व ओरिजनल कागदपत्रे घेऊन यायचे आहेत.
- भरलेल्या अर्जाची प्रत उमेदवारांनी सोबत ठेवायचे आहे. आवश्यकतेनुसार मुलाखतीला येताना सोबत परत घेऊन यायचे आहे.