NHM Satara Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 98 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 18 ऑक्टोंबर 2024 ही सदरील राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरती मधून वैद्यकीय अधिकारी आयुष पुरुष, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी आयुष महिला, दंत शैल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, लेखापाल, फायनान्स कब लॉजिस्टिक कन्सल्टंट / एफएलसी , फार्मसिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ, टीबी पर्यवेक्षक, कोल्ड चेन टेक्निशियन, ब्लॉक एम अँड इ, स्टाफ नर्स, साथ रोग तज्ञ या पदांकरिता योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सातारा येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत भरल्या जाणाऱ्या पदा बद्दल माहिती खालील प्रमाणे.
- 98 रिक्त जागा राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा यांच्याद्वारे “वैद्यकीय अधिकारी आयुष पुरुष, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी आयुष महिला, दंत शैल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, लेखापाल, फायनान्स कब लॉजिस्टिक कन्सल्टंट / एफएलसी , फार्मसिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ, टीबी पर्यवेक्षक, कोल्ड चेन टेक्निशियन, ब्लॉक एम अँड इ, स्टाफ नर्स, साथ रोग तज्ञ” या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत भरती निघालेली आहे.
NHM Satara Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे आहेत.
- लॅब टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेबद्दल DMLT कोर्स पूर्ण केला पाहिजे. यापेक्षा उच्च शिक्षण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- वैद्यकीय अधिकारी आयुष – पुरुष या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BAMS पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- वैद्यकीय अधिकारी आयुष – महिला या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BAMS पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- डेंटल सर्जन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BDS पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे दोन वर्षाचा अनुभव पाहिजे. किंवा उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची MDS पदवी पाहिजे.
- अकाउंटंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीकॉम पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. ज्या उमेदवारांचे टॅली ERP आणि टायपिंग कौशल्य आहे आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- फिजिओथेरपिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून फिजिओथेरपी मध्ये पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- फायनान्स कम लॉजिस्टिक कन्सल्टंट / FLC या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Com / MBA ( Finance ) पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा Tally-ERP-9 कोर्स उत्तीर्ण झालेला पाहिजे. उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे.
- डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये पदवी किंवा पदविका उत्तीर्ण केली पाहिजे.
- फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून B.Pharma किंवा M.Pharma उत्तीर्ण केलेले पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी MS-CIT कोर्स पूर्ण केला पाहिजे.
- टीबी सुपरवायझर ( TBHV ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराकडे MPW / LHV / ANW / आरोग्य सेवक प्रमाणपत्र / TB सुपरवायझर कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट तर मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे.
- टीबी सुपरवायझर ( STS ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट असले पाहिजे. उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे. उमेदवाराकडे दुचाकी चालवण्याचे लायसन असणे आवश्यक आहे.
- कोल्ड चेन टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेची तीन वर्षाचे पदविका उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ब्लॉक एम अँड ई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून गणित किंवा स्टॅटिस्टिक विषयांमध्ये B.Sc पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी MS-CIT कोर्स पूर्ण केला पाहिजे.
- स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीएससी नर्सिंग / GNM पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- साथ रोग तज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय क्षेत्रातून DPH / MPH – MHA / DHA / MBA – HCA यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- सदरील NHM Satara Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता शुल्क ₹ 500 असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 300 रुपये असणार आहे.
- NHM Satara Bharti 2024 या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 43 वर्षापर्यंत असेल. व यासंदर्भातील अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कार्यालय, सातारा ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथील भरतीसाठी अर्ज करायला 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात होणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
NHM Satara Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर करावा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
- सदरील NHM Satara Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी आधार कार्ड वर असलेले नावच अर्जामध्ये लिहायचे आहे. उमेदवारांनी स्वतःची सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सत्य सादर करायचे आहेत. कोणतेही चुकीचे डॉक्युमेंट सादर केले गेले. तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- आरोग्य विभागातील भरतीसाठी 18 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
- आरोग्य विभागात काम करण्याकरिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील सातारा भरती संदर्भात काळजीपूर्वक माहिती वाचावी.
NHM Satara Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा या भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा या भरती मधून त्याच उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल. ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केलेला आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा या भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला. तर त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा या भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी सातारा जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये काम असेल. कोणत्या उमेदवाराला कोणत्या ठिकाणी काम आहे हे ठरवण्याचे पूर्णपणे काम आरोग्य अभियानाद्वारे होणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा या भरती करिता आवश्यक माहिती जाहिरातीत दिलेली आहे.
NHM Satara Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथील भरती मधील पदांचे तालुक्यानुसार विवरण खालील प्रमाणे आहे.
- कराड, रहिमतपूर, सातारा या ठिकाणी 3 लॅब टेक्निशियन ची आवश्यकता आहे.
- वैद्यकीय अधिकारी आयुष – पुरुष या पदांसाठी पाटण, कोरेगाव, महाबळेश्वर, फलटण, सातारा या ठिकाणी सहा जागांची आवश्यकता आहे.
- दहिवडी, मेढा, कराड, वडूज, महाबळेश्वर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आयुष – महिला या पदांच्या हा 06 जागा भरल्या जाणार आहे.
- ग्रामीण रुग्णालय वडूज येथे डेंटल सर्जन पदाच्या 1 जागा भरली जाणार आहे.
- तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खंडाळा येथे अकाउंटंट पदासाठी 01 रिक्त जागा आहेत.
- जिल्हा रुग्णालय सातारा येथे फिजिओथेरपिस्ट पदाच्या 02 जागा रिक्त आहेत.
- जिल्हा रुग्णालय सातारा येथे फायनान्स कम लॉजिस्टिक कन्सल्टंट पदासाठी 01 जागा रिक्त आहे.
- जिल्हा रुग्णालय सातारा येथे डायलिसिस टेक्निशियन पदाची एक जागा आहे.
- कराड, फलटण, सातारा येथे फार्मासिस्ट पदाच्या 03 जागा आहेत.
- टीबी सुपरवायजर या पदासाठी कराड येथे एक जागा आहे.
- टीबी सुपरवायजर या पदासाठी सातारा येथे दोन जागा आहेत.
- कोल्ड या पदासाठी जिल्हा परिषद सातारा येथे एक जागा आहे.
- ब्लॉक एम अँड ई या पदासाठी खंडाळा, मान, फलटण या ठिकाणी तीन जागा आहेत.
- सातारा जिल्ह्यामध्ये स्टाफ नर्स या पदाच्या एकूण 66 जागा आहेत.
- जिल्हा परिषद सातारा येथे साथ रोग तज्ञ पदासाठी एक जागा आहे.
NHM Satara Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
- 18 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 18 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- NHM Satara Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
- सदरील NHM Satara Bharti 2024 भरती कंत्राटी स्वरूपाची करारावर असणार आहे.
- 11 महिने 29 दिवसांकरिता उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना ₹ 100 च्या स्टॅम्प पेपरवर नियम व अटींची पूर्तता करतो असे लिहून द्यावे लागेल.