Nagar Vikas Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नगर विकास विभाग येथे निघालेल्या 208 जागांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 1] नगररचनाकार, गट अ 2] सहाय्यक नगर रचनाकार, गट ब या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सदरील भरती करिता इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. या भरती संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- 208 रिक्त जागा नगर विकास विभाग येथील भरती मधून भरण्यात येणार आहेत.
- नगररचना, गट अ , सहाय्यक नगर रचनाकार, गट ब या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत भरती.
Nagar Vikas Vibhag Bharti 2024 | नगर विकास विभाग येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे.
- नगर रचनाकार ,गट अ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधून स्थापत्य अभियांत्रिकी / शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी / नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी / आर्किटेक्चर / बांधकाम तंत्रज्ञान / मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन यापैकी कोणतीही एक पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन किंवा टाऊन प्लॅनिंग या क्षेत्रामध्ये कमीत कमी तीन वर्ष काम केलेला अनुभव असावा.
- सहाय्यक नगर रचनाकार, गट ब या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालया मधून स्थापत्य अभियांत्रिकी / नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी / शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी / आर्किटेक्चर / बांधकाम तंत्रज्ञान / मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन यापैकी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीय, आ.दु.घ., अनाथ या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल.
- नगर रचनाकार ,गट अ या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात 719 रुपये असणार आहे. स्वर्गीय, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांकरिता शुल्क 449 रुपये असणार आहे.
- सहाय्यक नगर रचनाकार, गट ब या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 394 रुपये असणार आहे. मागासवर्गीय, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 294 रुपये असणार आहे.
- सदरील Nagar Vikas Vibhag Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
- नगर रचनाकार ,गट अ या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
- सहाय्यक नगर रचनाकार, गट ब या पदाकरिता जाहीर करण्यात आलेली जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नगर विकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
Nagar Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
- सदरील Nagar Vikas Vibhag Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची कोणतीही ऑफलाईन सुविधा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून देण्यात आलेली नाही.
- महाराष्ट्र नगर रचना विकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती आणि शैक्षणिक पात्रता योग्य आणि बरोबर लिहायचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- महाराष्ट्र नगर रचना विकास विभाग येथील भरतीसाठी 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करावा.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र नगर रचना विकास विभाग भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण वाचावी.
Nagar Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र नगर विकास विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र नगर विकास विभाग येथील भरती करिता अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच परीक्षेसाठी पात्र असतील.
- महाराष्ट्र नगर विकास विभाग येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA / DA देण्यात येणार नाही.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षे करिता किंवा मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारांनी फॉर्मल ड्रेस वर येणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर आयोगाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- महाराष्ट्र नगर विकास विभाग येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा यासंदर्भात माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nagar Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र नगर विकास विभाग येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- नगर रचनाकार ,गट अ या पदासाठी एकूण 60 जागा असणार आहेत.
- सहायक नगर रचनाकार, गट ब या पदासाठी एकूण 148 जागा असणार आहेत.
- 4 नोव्हेंबर 2024 ही नगर रचनाकार ,गट अ या पदाकरिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- सदरील भरती मधील पदांसाठी जागा कमी जास्त झाल्या किंवा आरक्षणामध्ये काही बदल करण्यात आला तर त्या संदर्भातील माहिती संपूर्ण माहिती संकेतस्थळावर देण्यात येईल. उमेदवारांनी संकेतस्थळ चेक करत रहावे.
- खेळाडू, दिव्यांग उमेदवार, महिला, मागास प्रवर्ग यांच्याकरिता सामाजिक आणि समांतर आरक्षण शासनाद्वारे वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमानुसार असेल.
- सहायक नगर रचनाकार, गट ब या पदांसाठी एकूण पदांपैकी अनुसूचित जाती प्रवर्ग करिता 21 जागा रिक्त असल्या पाहिजेत. अनुसूचित जाती प्रवर्गात 07 जागा रिक्त असल्या पाहिजेत. विमुक्त जमाती ( अ ) या प्रवर्गा करिता 03 रिक्त जागा असतील. भटक्या जाती ( ब ) या प्रवर्गासाठी एकूण 04 जागा रिक्त असतील. भटक्या जमाती ( क ) या पदासाठी एकूण 05 जागा असतील. भटक्या जमाती ( क ) या पदासाठी एकूण 02 जागा असतील. विशेष मागास प्रवर्ग साठी 03 जागा रिक्त असतील. सा. व शै. मागासवर्ग या पदासाठी एकूण 15 जागा रिक्त असतील. आ. दू. घ या प्रवर्गासाठी एकूण 15 जागा रिक्त असतील. इतर मागासवर्ग यांच्यासाठी 31 जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 42 जागा रिक्त आहेत.
- अनाथ उमेदवारांसाठी 01 जागा रिक्त आहे. दिव्यांग प्रवर्गात एकूण 06 जागा रिक्त आहेत.
- नगररचनाकार, गट अ या पदासाठी एकूण 60 जागा रिक्त आहेत. त्यामधील अनुसूचित जातीसाठी 07 जागा आहेत. 04 अनुसूचित जमाती करिता आहे. 2 जागा वीमुक्त जाती ( अ ) करिता आहेत. भटक्या जमाती ( ब ) करिता 02 जागा रिक्त आहेत. भटक्या जमाती ( क ) करिता 02 जागा रिक्त आहेत. भटक्या जमाती ( ड ) करिता 02 जागा रिक्त आहेत. विशेष मागास प्रवर्ग करिता 01 जागा रिक्त आहे. सा. व शै. मागासवर्ग या प्रवर्गासाठी 06 जागा रिक्त आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी 09 जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 19 जागा रिक्त आहेत.
- सदरील पदासाठी अनाथ उमेदवारांकरिता 01 जागा रिक्त आहे. तर दिव्यांग उमेदवारा करिता 02 जागा आहेत.
- ज्या दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग 40 टक्के पेक्षा जास्त आहे. आशा उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घेता येईल. त्याकरिता उमेदवाराकडे दिव्यांग असलेल्या चे शासनमान्य प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- सदरील Nagar Vikas Vibhag Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 56,100 ते 1,77,500 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील Nagar Vikas Vibhag Bharti 2024 पदासाठी कर्तव्य आणि जबाबदारी आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी.