Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथे 1846 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई महानगरपालिका येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती विस्तृतपणे पाहणार आहोत. मुंबई महानगरपालिका यांच्याकडून सदरील भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती ही 1846 रिक्त जागांसाठी होणार आहे. कार्यकारी सहाय्यक ( लिपिक ) ग्रेड ‘ क ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती समजून घेणे गरजेचे आहे. मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • मुंबई महानगरपालिकेत द्वारे 1846 जागांकरिता सदरील भरती होणार आहे.
  • मुंबई महानगरपालिकेत द्वारे होणाऱ्या भरती मधून “सहाय्यक ( लिपिक ) ग्रेड ‘ क ‘ ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

Table of Contents

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरती मधील पदे आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

  • मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी 45% गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • उमेदवाराने मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट परीक्षा शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थे कडून MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षापर्यंत असावे.
  • वरील रिक्त पदांवरती योग्य उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराला 25,500 ते 81,900 रुपये वेतन दरमहा मिळेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 1000 रुपये असणार आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 900 रुपये असणार आहे.
  • मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • 11 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेच्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीची अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.
  • महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी भरतीच्या अपडेट साठी येथे क्लिक करा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची वेबसाईट जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा मुंबई महानगरपालिका द्वारे देण्यात आलेली नाही. तरी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू नये.
  • सदरील भरतीसाठी Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज भरत असताना उमेदवारांनी योग्यरीत्या भरावा. त्याचप्रमाणे स्वतःचे पूर्ण नाव, शिक्षण, जन्मतारीख, वडिलांचे नाव, पत्ता, पिनकोड यांसारख्या गोष्टी उमेदवारांनी बरोबर लिहाव्या. यामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. आणि यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
  • 11 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर कोणाचेच अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कारण ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी या भरतीची संपूर्ण माहिती समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी उमेदवारांनी महानगरपालिके कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी किंवा पीडीएफ मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.

  • अर्ज केलेल्या उमेदवारा इतर कोणत्याही उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी किंवा मुलाखतीला येण्याकरिता मुंबई महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन या भरती संदर्भात अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील नोकरी संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • सदरील भरती मधील पदे सरळ सेवेमार्फत भरण्यात येणार आहेत.
  • मुंबई महानगरपालिका येथे सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे.
  • सदरील भरती Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • पूर्वी लिपिक म्हणून असणारे पद आता कार्यकारी सहाय्यक ग्रेड ‘ क ‘ नुसार आहे.
  • नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना परमनंट नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
  • आरक्षणाच्या तरतुदीनुसार सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ” क.एमपपीआर/7814 वद.14.08.2024 ” या जाहिरात क्रमांकानुसार 1846 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे.
  • एकूण 1848 जागांपैकी अनुसूचित जाती साठी 142 रिक्त जागा आहेत. अनुसूचित जमाती करिता 150 रिक्त जागा आहे. विमुक्त जाती ( अ ) करिता 49 रिक्त जागा आहेत. भटक्या जाती ( ब ) साठी 54 जागा रिक्त आहेत. भटक्या जाती ( क ) साठी 39 रिक्त जागा आहेत. भटक्या जाती ( ड ) करिता 38 रिक्त जागा आहेत. विविध मागास प्रवर्गासाठी 46 जागा रिक्त आहेत. इतर मागासवर्ग करिता 452 रिक्त जागा आहेत. आ.दू.घ प्रवर्गासाठी 185 जागा रिक्त आहेत. सा.शै. मा. व प्रवर्गासाठी 185 जागा रिक्त आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 506 जागा आहेत.
  • सदरील भरतीमध्ये महिलांकरिता 30 टक्के आरक्षण आहे. माजी सैनिकां करिता 15 टक्के आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्त करिता 5% आरक्षण आहे. भूकंपग्रस्त करिता 2% आरक्षण आहे. खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण आहे. सुशिक्षित बेरोजगार करिता 10 टक्के आरक्षण आहे. अनाथ मुलांसाठी एक टक्के आरक्षण आहे तर दिव्यांगांसाठी 4% आरक्षण आहे.
  • सदरील भरती मधील पदांची संख्या कमी किंवा वाढवणे, सामाजिक, समांतर आरक्षण बदलणे, भरती पूर्णपणे रद्द करणे. भरतीमध्ये स्थगिती आणणे याचा पूर्णपणे अधिकार आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज दिव्यांग उमेदवार 40% पेक्षा कमी दिव्यांग असेल तर त्याचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी असणाऱ्या पदांकरिता दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या पदांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त एका पदासाठी अर्ज अर्ज करता येईल. एकापेक्षा अधिक अर्ज केलेल्या आढळल्यास शेवटचा केलेला अर्ज ग्राह्य धरला जाईल. आणि इतर अर्जांसाठी भरलेली फी जप्त करण्यात येईल.
  • खुल्या प्रवर्गामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात. पण एकापेक्षा अधिक अर्ज उमेदवार करू शकत नाहीत.
  • महिलांसाठी दिलेल्या राखीव जागांमध्ये जर एखाद्या पदाकरिता महिला उपलब्ध नसल्यास त्या पदावर खुल्या प्रवर्गातील पुरुषाला नियुक्त करण्यात येईल.
  • माजी सैनिक यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या पदांवर नियुक्ती करण्याकरिता उमेदवाराने जिल्हा सैनिक कल्याण मंडळ यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. जिल्हा सैनिक बोर्ड येथे नोंदणी केलेले चे प्रमाणपत्र उमेदवाराकडे कागद पडताळणी वेळीस आणि नियुक्ती झाल्यानंतर असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केलेली असावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 45% गुणासह प्रथम प्रयत्नात मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, विज्ञान, कला, विधी आणि तत्सम शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • ज्या विद्यापीठांमध्ये 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टीम ( CB GS ) पद्धतीने श्रेणी देण्यात आलेली आहे. अशा विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालील सूत्रावर मोजण्यात येईल.टक्केवारी = 7.1 X CGPA + 11
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा मराठी 100 गुणाची व इंग्रजी 100 गुणांची विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  • उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून MS-CIT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • ऑपरेटिंग सिस्टीम, स्प्रेडशीट, वर्ड प्रोसेसिंग, डेटाबेस सॉफ्टवेअर, प्रेझेंटेशन, इंटरनेट व ई-मेल यासंदर्भात उमेदवाराकडे उत्तम प्रकारचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी आवश्यक वयाच्या अटी खालील प्रमाणे आहेत.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. त्याचबरोबर 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारा करिता उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • माजी सैनिक उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षे सूट राहील. अपंग माजी सैनिकां करिता वय मर्यादा 45 वर्षापर्यंत राहील.
  • प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांकरिता वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत राहील.
  • खेळाडू उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
  • सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता वय मर्यादा 55 वर्षे राहील.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी वय मर्यादा 45 वर्षांपर्यंत राहील.
  • अनाथ असणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 43 वर्षे राहील.
  • स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असणाऱ्या उमेदवारा करिता वयोमर्यादा 45 वर्षे राहील.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी पदांची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सदरील भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी आणि शर्ती ची पूर्तता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
  • संगणकावर वर घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी असणार आहे.
  • या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चा दर्जा पदवीच्या प्रश्नपत्रिकेच्या दर्जाप्रमाणे राहील. 12 वीच्या परीक्षेच्या दर्जाप्रमाणे फक्त मराठी आणि इंग्रजी विषयाचा दर्जा राहील.
  • संगणकावर होणाऱ्या परीक्षेचे एकूण गुण 200 असतील. तर या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न असतील. एका प्रश्नाला दोन गुण असतील.
  • मराठी भाषा व व्याकरण यासाठी एकूण 25 प्रश्न असतील. इंग्रजी भाषा व व्याकरण यासाठी एकूण 25 प्रश्न असतील. सामान्य ज्ञान या विषयासाठी एकूण 25 प्रश्न असतील. बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न असतील. अशा प्रकारे सर्व मिळून 100 प्रश्न असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला गुणवत्ता यादी मध्ये येण्याकरिता एकूण गुणाच्या 45% गुण मिळणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील तारीख लक्षात ठेवावी.

  • 11 ऑक्टोबर 2024 ही सदरील ऑनलाइन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 11 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर ऑनलाइन पद्धतीने मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment