Mahanirmiti Bharti 2024 | महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड येथे 800 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Mahanirmiti Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी येथे निघालेल्या 800 जागांसाठी च्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या भरती मधून एकूण 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांना लवकरच कळविण्यात येईल. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. ” तंत्रज्ञ-3″ या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महानिर्मिती कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 800 रिक्त जागा महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्याकडून भरण्यात येणार आहेत.
  • ” तंत्रज्ञ-3″ या पदासाठी महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्याकडून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे नोकरीचे सुवर्णसंधी.

Mahanirmiti Bharti 2024 | महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे आहेत.

  • ” तंत्रज्ञ – 3″ या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अनुसूचित जाती करिता एकूण 104 जागा रिक्त आहेत.
  • अनुसूचित जमाती करिता एकूण 56 जागा रिक्त आहेत.
  • विमुक्त जाती ( अ ) करिता एकूण 24 जागा रिक्त आहेत.
  • भटक्या जाती ( ब ) करिता एकूण 20 जागा रिक्त आहेत.
  • भटक्या जाती ( क ) करिता एकूण 28 जागा रिक्त आहेत.
  • भटक्या जमाती ( ड ) करिता एकूण 16 जागा रिक्त आहेत.
  • विमाप्र यांच्याकरिता एकूण 16 जागा रिक्त आहेत.
  • Mahanirmiti Bharti 2024 इतर मागासवर्ग यांच्याकरिता एकूण 152 जागा रिक्त आहेत.
  • अति दुर्मिळ घटक यांच्याकरिता एकूण 80 जागा रिक्त आहेत.
  • सा. आणि शै. मा. वर्ग ( SEBC ) या प्रवर्गात एकूण 80 जागा रिक्त आहेत.
  • खुल्या प्रवर्गातील एकूण 224 जागा रिक्त आहेत.
  • महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.
Mahanirmiti Bharti 2024
Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024 | महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्याद्वारे ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत राबवण्यात आलेली नाही.
  • Mahanirmiti Bharti 2024 महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड येथील भरती करिता ऑफलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये लिहिलेली संपूर्ण माहिती योग्य आणि बरोबर लिहायचे आहे. ओरिजनल माहिती आणि अर्ज मध्ये लिहिलेली माहिती यामध्ये तफावत आढळली तर उमेदवाराचा अर्ज तात्काळ बाद करण्यात येईल.
  • महानिर्मिती येथील भरती संदर्भात अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
  • महानिर्मिती येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Mahanirmiti Bharti 2024 | महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील माहिती सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • सदरील Mahanirmiti Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांमधून च योग्य उमेदवाराला पदावर नियुक्त करण्यात येईल.
  • महानिर्मिती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • महानिर्मिती यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर असा उमेदवारावर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरती संदर्भात जर परीक्षा घेण्यात आली तर त्या परीक्षा वेळेस उमेदवारांनी देण्यात आलेले प्रवेश पत्र घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • महानिर्मिती कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Mahanirmiti Bharti 2024 | महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेसंदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • महाराष्ट्र शासनाच्या विद्युत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे महानिर्मिती ही आहे. महानिर्मिती लाच महागेनको म्हणजेच महाराष्ट्र राज्य स्टेट पावर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड असे म्हणतात. ही महाराष्ट्र शासनाची एक विद्युत वीज निर्माण करणारी कंपनी आहे. या संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्यात वीज निर्मिती करण्यात येते. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या संस्थे नंतर सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी संस्था म्हणजे महानिर्मिती ही आहे. थर्मल पावर स्टेशन, गॅस टरबाइन, हायड्रो पॉवर स्टेशन यांसारखे प्रकल्प महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून चालवण्यात येतात.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांची पुनर्रचना झाल्यानंतर महाजनको, महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी ( महावितरण ), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ( महापरेशन ) या तीन संस्थांची निर्मिती दिनांक 6 जून 2005 रोजी झालेली आहे. महाजनको मध्ये कामगारांची भरती करण्याकरिता वेळोवेळी आयबीपीएस द्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले असते. या संस्थेमधून एकूण 13220 MW इतक्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी महाराष्ट्र राज्य पावर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था आहे.
  • महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेद्वारे 9514 MW इतकी वीज थर्मल प्लांट द्वारे बनवण्यात येते. 2580 MW इतकी वीज हायड्रो पॉवर जनरेशन ने बनवता येते. 428 MW एवढी वीज सोलार जनरेशन द्वारे बनवण्यात येते. 672 MW एवढी वीज गॅस जनरेशन द्वारे बनवण्यात येते. या संस्थेचे थर्मल प्लांट नाशिक, भुसावळ, पारस, खापरखेडा, कोरडी, चंद्रपूर , परळी या ठिकाणी थर्मल पावर प्लांट आहेत. तर उरण या ठिकाणी गॅस टरबाइन पावर प्लांट आहे. कोयना आणि घाटघर या ठिकाणी हायड्रोइलेक्ट्रिक पावर प्लांट आहेत. शिरसुफळ, बारामती, चंद्रपूर, शिवाजीनगर, साकरी या ठिकाणी सोलार पॉवर जनरेशन प्लांट आहेत.
  • कोरडी थर्मल पावर प्लांट प्रोजेक्ट हा दगडी कोळशावर आधारित वीज निर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामधून एकूण 2 X 660 MW इतकी वीज तयार केली जाते. 1 डिसेंबर 2023 रोजी या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. सदरील प्रकल्पाचे सध्या काम सुरू असून याचे काम 2028-29 या सालापर्यंत संपणार आहे.
  • भुसावळ थर्मल प्रोजेक्ट प्लांट हा सुद्धा महाराष्ट्र पावर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा दगडी कोळशावर चालणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून 660 MW इतकी वीज निर्माण केली जाते. या प्रोजेक्टला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. पर्यावरणाच्या सर्व नियमांचे पालन केल्यानंतर 31 डिसेंबर 2018 रोजी या प्रकल्पाला LOA द्वारे मान्यता देण्यात आली. 30 मार्च 2024 रोजी या प्रकल्पाचा बॉयलर पेटवण्यात आला. ऑक्टोबर 2023 मध्ये वाफेचा प्रयोग पूर्ण करण्यात आला. 17 जानेवारी 2024 रोजी 43 MW वीज निर्माण करण्यात आली.
  • Mahanirmiti Bharti 2024 महाराष्ट्र पावर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा चंद्रपूर येथील थर्मल पावर प्लांट चा प्रोजेक्ट 800 MW इतक्या कॅपॅसिटी चा आहे. पण सध्या तो अजून प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे. महानिर्मिती द्वारे तयार करण्यात येणारा दुसरा पारस थर्मल प्रोजेक्ट हा सुद्धा 800 MW इतक्या कॅपॅसिटी चा आहे. या प्रकल्पाचे सुद्धा अजून संपूर्ण काम पूर्ण झालेले नाही.
  • महाराष्ट्र पावर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती संदर्भात वरील दिलेली माहिती काही प्रमाणात अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment