Kolhapur Police Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हापूर पोलीस यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 22 जागांच्या भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. कोल्हापूर पोलीस येथील भरती मधून 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 31 ऑक्टोबर 2024 ही सगळी भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सदरील भरती मधून ‘ विधी अधिकारी ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. कोल्हापूर पोलीस येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 22 रिक्त जागांसाठी कोल्हापूर पोलीस यांच्याकडून Kolhapur Police Bharti 2024 भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
- ‘ विधी अधिकारी ‘ या पदाकरिता योग्य उमेदवारांची नेमणूक सदरील भरती मधून करण्यात येणार आहे.
आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज भरती.
Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस विभाग येथील भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.
- कोल्हापूर पोलीस विभाग येथील भरती मधील ‘ विधी अधिकारी ‘ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कायद्याची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याच्याकडे सनद असावी.
- अर्ज करणाऱ्या वकिली व्यवसायाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असावा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे गुन्हेगारीविषयक, सेवाविषयक, प्रशासनिक यासंदर्भात ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवार कायदाविषयक चौकशी आणि कारवाई कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- विधी अधिकारी गट- ब या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 25,000 रुपये वेतन मिळेल. त्याचबरोबर उमेदवाराला प्रवासाचा खर्च आणि मोबाईलचा खर्च 3000 रुपये मिळेल. असे एकूण मिळून दरमहा 28000 मिळतील.
- विधी अधिकारी या पदासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 20,000 रुपये वेतन मिळेल. पदावर नियुक्त उमेदवाराला मोबाईलचा आणि प्रवासाचा खर्च ₹ 3000 मिळेल. असे सर्व मिळून दरमहा एकूण 23000 रुपये वेतन मिळेल.
- ‘विधी अधिकारी’ व ‘विधी अधिकारी गट- ब ‘ या दोन्ही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 60 वर्षापेक्षा अधिक नसावे.
- वरील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
- सदरील Kolhapur Police Bharti 2024 भरती करिता घेण्यात येणारी निवड चाचणी एकूण 75 गुणांची असेल.
- संबंधित पदा संदर्भात उमेदवाराची क्षमता तपासण्या करिता बहुपर्यायी व वस्तुनिष्ठ चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये सेवाविषयक व फौजदारी प्रकरणे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रकरणे, न्यायिक स्थिती, भारतीय न्यायव्यवस्था, भारतीय पुरावा कायदा, भारतीय साक्ष अधिनियमन, किरकोळ कायदे, फौजदारी न्याय निवाडे, महाराष्ट्र नागरी सेवा नियम यांसारख्या विषयांवर सदरील भरती मधील परीक्षांचे प्रश्न असतील.
- लेखी परीक्षा नंतर उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल. ही मुलाखत एकूण 25 गुणांची असणार आहे. सदरील भरती मधील एकूण जागेच्या तीन पट उमेदवार लेखी परीक्षेच्या गुणवत्ता यादी मधून निवडण्यात येणार आहेत. निवडलेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख आणि वेळ कळवण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि तोंडी परीक्षेत मिळालेले गुण दोन्ही एकत्र करून उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने पदावर नियुक्ती केली जाणार आहे.
- पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा दोन्ही मध्ये मिळालेले गुण 60% असणे गरजेचे आहे.
- कोल्हापूर पोलीस यांच्याकडून सदरील Kolhapur Police Bharti 2024 भरती करिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- ‘पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर-४१६००३’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.
- कोल्हापूर पोलीस विभाग यांच्याकडून अर्ज करण्याचा पत्ता जाहीर करण्यात आलेला आहे. त्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोल्हापूर पोलीस विभाग यांच्याकडून सुविधा देण्यात आलेली नाही.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना जाहिरातीत दिलेली सर्व शैक्षणिक कागदपत्रे उमेदवाराने सत्य प्रतीत करून अर्जासोबत जोडायचे आहेत. जर कोणतेही कागदपत्र अर्जासोबत जोडलेले नसेल तर असा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- कोल्हापूर पोलीस विभाग येथील Kolhapur Police Bharti 2024 भरतीसाठी 31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- कोल्हापूर पोलीस विभाग येथील Kolhapur Police Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस विभाग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- कोल्हापूर पोलीस विभाग येथील Kolhapur Police Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरतीसाठी पात्र असतील.
- कोल्हापूर पोलीस विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या किंवा भरतीमध्ये सहभाग घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये पोलीस भरती मध्ये अनुचित प्रकार करण्यात येत असल्याचे प्रकरणे दररोज समोर येत आहेत. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने सदरील भरती मध्ये अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरती मध्ये जे उमेदवार आवश्यक पात्रतेची पूर्तता करत आहेत आशा उमेदवारांनी सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवार निवडण्याची प्रक्रिया जाहिरातीमध्ये सविस्तरपणे समजून सांगण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात वाचावी. आणि त्यानुसार अर्ज करावा.
Kolhapur Police Bharti 2024 | कोल्हापूर पोलीस विभाग येथील भरती मधून ‘ विधी अधिकारी’ या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी कर्तव्य आणि जबाबदारी खालील प्रमाणे आहेत.
- कोल्हापूर पोलीस कार्यालय या ठिकाणी प्राप्त होणाऱ्या कायदेविषयक बाबींना आणि न्यायालयीन प्रकरणांना सल्ला देणे. न्यायालयात चालू असणारी प्रकरणे हाताळणे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला सेवाविषयक, प्रशासकीय बाबी, विभागीय चौकशी याबाबत सर्व प्रकरणांमध्ये सल्ला देणे आणि सर्व प्रकरणे हाताळणे.
- सरकारी वकिलांकडे सतत पाठपुरवठा करणे ज्यामुळे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास मदत होईल. ज्या प्रकरणांमध्ये प्रतिवादी शासन आहे अशा प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईचे प्रतिज्ञापत्र तयार करून घेणे.
- तयार केलेल्या शपथ पत्राच्या मसुद्याला सक्षम अधिकाऱ्याकडून मान्यता घेऊन न्यायालयात सादर करणे.
- ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने शासनाच्या विरोधात निकाल दिलेला आहे. अशा प्रकरणांचा अभ्यास करणे आणि त्यासंदर्भात अपील वरिष्ठ न्यायालयात दाखल करणे.
- कायदेविषयक नेमून देण्यात आलेले काम वेळेत पार पाडणे.
- प्रथम खबरी अहवाल पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यास मदत करणे.
- कायदा, सेवा आणि प्रशासना संदर्भातील सर्व कामे पार पाडणे.
- सदरील पदाची नेमणूक पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर होणार आहे. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
- सुरुवातीला सदरील भरती मधील पदे 11 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवार वकिली व्यवसाय संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करू शकणार नाही. उमेदवाराला वकील व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिलेली नसताना जर उमेदवाराने खाजगी वकिली केली तर अशा उमेदवारावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरती मधील लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही उमेदवाराला खर्च देण्यात येणार नाही.
- कोल्हापूर पोलीस विभाग भरती येथील भरती संदर्भात वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- 31 ऑक्टोंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सर्व उमेदवारांनी या तारखेपूर्वी आपले अर्ज जमा करायचे आहेत.