GPSC Goa Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत निघालेल्या 25 जागांच्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गोवा लोकसेवा आयोग येथील भरती मधून 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. गोवा लोकसेवा आयोग यांच्याकडून सदरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, असिस्टंट प्रोफेसर, मामलतदार/Jt. मामलतदार/दक्षता अधिकारी, भौतिकशास्त्राचे व्याख्याता, विधी अधिकारी, तांत्रिक अधिकारी, शिक्षण सहायक संचालक या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी सदरील भरती आयोजित केली आहे. 25 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 25 रिक्त जागा गोवा लोकसेवा आयोग यांच्याकडून भरण्यात येणार आहेत.
- क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, असिस्टंट प्रोफेसर, मामलतदार/Jt. मामलतदार/दक्षता अधिकारी, भौतिकशास्त्राचे व्याख्याता, विधी अधिकारी, तांत्रिक अधिकारी, शिक्षण सहायक संचालक या पदांसाठी उमेदवारांची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी येथे भरती.
GPSC Goa Bharti 2024 | गोवा लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.
- क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायकॉलॉजी मधून उत्तर प्रदेश मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मास्टर ऑफ फिलोसोफी किंवा डिप्लोमा इन मेडिकल अँड सोशल सायकॉलॉजी ( दोन वर्षाचा कोर्स ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयाची पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- मामलतदार/Jt. मामलतदार/दक्षता अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- व्याख्याता ( भौतिकशास्त्र ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मानवता आणि विज्ञान या विषयांमधून पदव्युत्तर पदवी फर्स्ट क्लास ने उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- विधी अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- तांत्रिक अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हॅण्डलूम टेक्नॉलॉजी / हॅण्डलूम अँड टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी या शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- शिक्षण सहाय्यक संचालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हॅण्डलूम टेक्नॉलॉजी / हॅण्डलूम अँड टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी या शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- सदरील GPSC Goa Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गोवा असणार आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 45 वर्ष असणार आहे.
- या GPSC Goa Bharti 2024 भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- गोवा लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- गोवा लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
GPSC Goa Bharti 2024 | गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरती करिता उमेदवारांनी खालील नियम वाचा.
- गोवा लोकसेवा आयोग यांच्याकडून सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाइन पोर्टल देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी त्याद्वारे अर्ज करावा.
- सदरील GPSC Goa Bharti 2024 भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा गोवा लोकसेवा आयोग यांच्याकडून देण्यात आलेली नाही.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चूक झाली तर उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल. अपूर्ण राहिलेले अर्ज बाद करण्यात येतील.
- सदरील GPSC Goa Bharti 2024 भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 ऑक्टोबर 2024 ही देण्यात आलेली आहे.
- गोवा लोकसेवा येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
GPSC Goa Bharti 2024 | गोवा लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.
- गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सदरील भरती करिता फक्त अर्ज केलेले उमेदवारच पात्र असतील.
- गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची दक्षता सर्व उमेदवारांनी घ्यावी.
- गोवा लोकसेवा आयोग यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या कारवाईला उमेदवाराला सामोरे जावे लागेल.
- गोवा लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी प्रवेश पत्र सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. ज्या उमेदवाराकडे प्रवेश पत्र नसेल आशा उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही.
- गोवा लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात होणाऱ्या परीक्षांचे अभ्यासक्रम गोवा लोकसेवा आयोग यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
GPSC Goa Bharti 2024 | गोवा लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- एकदा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरला की त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने फी भरावी लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने फी भरायची असल्यावर उमेदवारांनी ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर मिळालेली पावती डाऊनलोड करून घ्यायची आहे.
- ऑफलाइन पद्धतीने पेमेंट करत असताना उमेदवारांनी ई-चलन जनरेट करायचे आहे. त्यानंतर उमेदवारांनी एसबीआय बँकेच्या गोवा मधील शाखेत सदरील रकमेचे चलन भरायचे आहे. ही प्रक्रिया उमेदवारांनी अर्ज करायच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर करायची आहे. संबंधित चलन वर बँकेचा शिक्का असणे गरजेचे आहे. शिक्का मारलेली ई-चलन उमेदवारांनी आयोगाच्या ऑफिसमध्ये जमा करायचे आहे.
- उमेदवाराचे अर्ज शुल्क यशस्वीरित्या जमा झाल्यानंतर उमेदवार एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करू शकतो.
- ज्या उमेदवारांची फी अर्ज करायचा शेवटच्या तारखेनंतर जमा होईल. आशा उमेदवारांचे अर्ज रिजेक्ट केले जातील. आणि त्यांच्या फीचा कसल्याही प्रकारचा परतावा मिळणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अर्ज करताना भरायचा आहे. गोवा लोकसेवा आयोग यांच्याकडून उमेदवारा सोबत ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यांच्याद्वारे संवाद साधला जाईल.
GPSC Goa Bharti 2024 | गोवा लोकसेवा आयोग येथील भरती मधील पदांची संख्या खालील प्रमाणे.
- GPSC Goa Bharti 2024 क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट या पदासाठी एकूण 02 जागा रिक्त आहेत.
- असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी एकूण 16 जागा आहेत.
- मामलतदार/Jt. मामलतदार/दक्षता अधिकारी या पदासाठी एकूण 01 जागा आहे.
- भौतिकशास्त्राचे व्याख्याता या पदासाठी एकूण 02 जागा रिक्त आहेत.
- विधी अधिकारी या पदासाठी एकूण 01 जागा आहे.
- तांत्रिक अधिकारी या पदासाठी एकूण 01 जागा रिक्त आहे.
- शिक्षण सहाय्यक संचालक या पदासाठी एकूण 01 जागा रिक्त आहे.
GPSC Goa Bharti 2024 | सदरील भरतीसाठी वेतन खालील प्रमाणे असेल.
- असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी 15,600 ते 39,100 रुपये इतके वेतन असेल.
- इतर भरती मधील पदांसाठी असणारे वेतन पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती संदर्भात वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. उमेदवारांनी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी गोवा लोकसेवा आयोग यांनी दिलेल्या जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्याचबरोबर संकेतस्थळाला भेट द्यावी.
- दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- वरील GPSC Goa Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोंकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.