GMC Miraj Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 35 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

GMC Miraj Bharti 2024  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात महाविद्यालयाकडून प्रसिद्ध केली गेलेली आहे. सदरील होणाऱ्या भरती मधून 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती करिता जे उमेदवार इच्छुक आहेत आशा उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती मधून ” सहाय्यक प्राध्यापक” पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. 15 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील होणाऱ्या भरती मधून 35 जागा भरल्या जाणार आहेत.
  • ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ या पदाच्या जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे भरण्यात येणार आहेत.

यंत्र इंडिया लिमिटेड येथे भरती

GMC Miraj Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील भरतीसाठी वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

  • GMC Miraj Bharti 2024 सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 40 वर्षापर्यंत राहील.
  • ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेली शैक्षणिक अहर्ता उमेदवारांनी पूर्ण केलेली पाहिजे.
  • राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्याद्वारे मान्यताप्राप्त असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी या पदाचा एक वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी संबंधित विषयांमधून डीएनबी पदवी उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्याद्वारे देण्यात आलेल्या शैक्षणिक अटी पूर्ण केल्यावर उमेदवाराला पदावर नियुक्ती देण्यात येईल.
GMC Miraj Bharti 2024
GMC Miraj Bharti 2024
  • सदरील GMC Miraj Bharti 2024  भरती मधील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
  • ” वर्ग-२ आस्थापना शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पत्राद्वारे पाठवायचे आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • 17 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी मुलाखतीची तारीख आहे.
  • “अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृह.” या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक म्हणून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 1 लाख रुपये वेतन मिळणार आहे.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.

GMC Miraj Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • GMC Miraj Bharti 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ पदाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्याकडून देण्यात आलेली नाही.
  • ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ पदाकरिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी स्वतःचे शिक्षण, पूर्ण करत असलेल्या सर्व पात्रता, शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करत असताना बरोबर सादर करावीत. अर्जामध्ये काही चुकीचे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल. यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
  • सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

GMC Miraj Bharti 2024 | शासकीय महाविद्यालय, मिरज येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • शासकीय महाविद्यालय, मिरज येथील मुलाखतीसाठी फक्त अर्ज केलेले उमेदवारच पात्र ठेवू शकतात. इतर उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी प्रवेश मिळणार नाही.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या मुलाखतीकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
  • सदरील GMC Miraj Bharti 2024 भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी GMC Miraj Bharti 2024 भरतीची प्रक्रिया पूर्णपणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्याकडे असणार आहे.
  • सदरील GMC Miraj Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

GMC Miraj Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील भरती मधून शरीररचनाशास्त्र, शरीर क्रिया शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधशास्त्र, विकृती शास्त्र, प्रादेशिक रक्तपेढी, न्याय वैद्यक शास्त्र, जन औषध वैद्यक शास्त्र, औषध वैद्यक शास्त्र, क्ष- किरण शास्त्र, कान नाक व घसा शास्त्र, नेत्रशास्त्र, क्षयरोग शास्त्र, त्वचा व गुप्तरोग शास्त्र, मनोविकृती शास्त्र या विषयांसाठी ‘सहाय्यक प्राध्यापक’ यांची नेमणूक करायची आहे.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील भरती मधून बधिरीकरण शास्त्र, क्ष-किरण शास्त्र, स्त्रीरोग प्रसूती शास्त्र, औषध वैद्यक शास्त्र, विकृती शास्त्र या पदांसाठी ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ यांची नेमणूक करायची आहे.
  • सदरील GMC Miraj Bharti 2024 भरती मधील पदे 364 दिवसांकरिता तात्पुरत्या स्वरूपाची भरायची आहेत.
  • या भरतीसाठी संबंधित विषयांमध्ये शैक्षणिक अहर्ता व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड शासकीय नियमानुसार तात्पुरत्या स्वरूपाची केली जाणार आहे.
  • जे उमेदवार बंधपत्रित आहेत आशा उमेदवारांना सदरील पदांकरिता प्राधान्य देण्यात येईल. बंधपत्रित उमेदवार प्राप्त न झाल्यास त्या ठिकाणी अबंधपत्रित उमेदवाराला संधी देण्यात येईल.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना स्वतःचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे घेऊन येणे बंधनकारक आहे. जर उमेदवार मुलाखतीदरम्यान शैक्षणिक कागदपत्रे सादर करू शकला नाही. तर त्याच्या जागेवर दुसऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येईल.
  • सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना शासकीय मान्यता नुसार एकत्रित ठोक मानधन देण्यात येईल.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना स्वखर्चाने यायचे आहे.
  • सदरील GMC Miraj Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना पदावर रुजू होण्यासाठी सात दिवसाचा कालावधी देण्यात येईल. जर उमेदवार निवड झाल्यानंतर पदावर रुजू झाला नाही तर त्याच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल.
  • पदावर नियुक्त होण्यापूर्वी उमेदवार इतर ठिकाणी काम करत असेल. तर त्या ठिकाणचे ना हरकत प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.

GMC Miraj Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्याकडून अर्ज करायचा फॉर्म जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेला आहे.
  • उमेदवाराने सदरील अर्ज ” प्रति, मा. अधिष्ठता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज” यांच्याकडे करायचा आहे.
  • अर्जाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे.
  • अर्जाच्या विषयामध्ये उमेदवाराला ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ म्हणून कोणत्या विषयात काम करायचे आहे. त्या विषयाचे नाव लिहायचे आहे.
  • 1 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक 16323 याच्या संदर्भावरून उमेदवाराने अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व अटी व नियम उमेदवाराला मान्य असतील तरच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • ‘ सहाय्यक प्राध्यापक’ या पदासाठी देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता उमेदवाराकडून होत असेल तरच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • सुरुवातीला उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. त्यानंतर उमेदवाराने वडिलांचे / पतीचे पूर्ण नाव लिहायचे आहे.
  • उमेदवाराने स्वतःचा पत्रव्यवहाराचा पत्ता अर्जामध्ये व्यवस्थित लिहायचा आहे.
  • उमेदवाराने स्वतःची योग्य जन्मतारीख आणि स्वतःचे चालू वय अर्जामध्ये लिहायचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे.
  • उमेदवाराने स्वतःचे राष्ट्रीयत्व व आदिवासी प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडायचे आहे.
  • उमेदवाराने स्वतःचा प्रवर्ग व्यवस्थित लिहायचा आहे. त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्राची आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडायचे आहे.
  • उमेदवाराने स्वतःच्या 10 वी व 12 वी प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडायचे आहे.
  • उमेदवाराने ज्या महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी मिळवली त्या महाविद्यालयाचे नाव, विद्यापीठाचे नाव, विद्यापीठ शासकीय आहे की खाजगी आहे त्याबद्दल माहिती. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण केलेले वर्ष, पदवी मध्ये मिळालेले एकूण गुण, पदवीच्या सर्व सेमिस्टर चे प्रमाणपत्र यांच्या प्रती उमेदवारांनी अर्जासोबत जोडायचे आहेत.
  • उमेदवाराला ज्या विषयांमध्ये ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ म्हणून काम करायचे आहे त्या विषयातील पदवी मिळवलेले प्रमाणपत्र.
  • उमेदवाराने मिळवलेली इतर उच्च शैक्षणिक अहर्ता संदर्भातील प्रमाणपत्र.
  • उमेदवाराकडे असलेले एमएमसी / आयएमसी नोंदणी क्रमांक व नूतनीकरण प्रमाणपत्र ची प्रत उमेदवारांनी अर्जासोबत जोडायचे आहे.
  • उमेदवार ज्या महाविद्यालया सोबत बंद पत्रिका आहे अशा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज या ठिकाणी काम करत असलेल्या उमेदवारांनी विभाग प्रमुखांचे शिफारस पत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. आशा उमेदवारांनी विभाग प्रमुख द्वारे अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी स्वतःच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची प्रत अर्जासोबत जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर अर्जासोबत जोडण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी आणि त्यानंतरच अर्ज जमा करावा.
  • उमेदवाराकडे कोणत्याही कागदपत्राची कमतरता किंवा कागदपत्रांमध्ये तुरटी असल्यास त्यासंदर्भात माहिती नमूद करावी.
  • अर्जदाराने अर्जाच्या शेवटी स्वतःची स्वाक्षरी आणि अर्ज जमा करायची तारीख लिहायचे आहे.
  • अर्ज पडताळणी करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे नाव, स्वतःची सही आणि शिक्का अर्जाच्या शेवटी द्यायचा आहे.

Leave a Comment