AFMC Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज यांच्याद्वारे निघालेल्या 06 जागांसाठी च्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन ईमेलद्वारे आणि ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज करू शकतात. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज येथील होणाऱ्या भरती मधून “वैज्ञानिक-डी, वैज्ञानिक-सी, आरोग्य अर्थशास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, क्षेत्र अधिकारी” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2024 आहे. सदरील होणाऱ्या AFMC Pune Bharti 2024 भरती बाबत अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 06 जागा रिक्त असलेल्या भरतीचे आयोजन आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज , पुणे यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे.
- वरील AFMC Pune Bharti 2024 भरती मधील जागा वैज्ञानिक-डी, वैज्ञानिक-सी, आरोग्य अर्थशास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, क्षेत्र अधिकारी या आहेत.
AFMC Pune Bharti 2024 | आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज येथील भरतीसाठी उमेदवारांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे असणार आहे.
- वैज्ञानिक- डी ( मेडिकल ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MD/ MS / DNB / MPH यापैकी पदव्युत्तर पदवी MBBS नंतर मिळवलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे संशोधन क्षेत्रामध्ये काम केलेला कमीत कमी सहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून मिळवलेली MBBS पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबत कामाचा आठ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. किंवा उमेदवारांनी एमबीबीएस नंतर पदव्युत्तर पदवी डिप्लोमा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे पाच वर्षे कामाचा अनुभव पाहिजे. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून Cummunity Medicine / Preventive & Social Medicine / Paediatrics / Medicine / Tropical Medicine / cummunity Health Administrative / Health Administrative / Family Medicine / Epidemiology / Public Health या शाखेमधून पीएचडी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- वैज्ञानिक- डी ( नॉन- मेडिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून मायक्रो बायोलॉजी / बायो केमिस्ट्री / बायो टेक्नॉलॉजी या शाखेमधून पीएचडी पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे पीएचडी नंतर संबंधित शाखेमध्ये अध्यापनाचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे. किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MPH / D Pharma ही पदवी फर्स्ट क्लास में उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे मास्टर डिग्री असणे गरजेचे आहे. मास्टर डिग्री नंतर आठ वर्ष अध्यापनाचा अनुभव पाहिजे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सेकंड क्लास ची M.Sc / MPH पदवी असावी. त्या उमेदवाराने पीएचडी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे पीएचडी नंतर आठ वर्ष अध्यापनाचा अनुभव असावा. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- वैज्ञानिक- सी ( नॉन मेडिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.Sc लाइफ सायन्स / MPH / MHA / M. Pharma / D. Pharma यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केली असावी. त्याचबरोबर संबंधित शाखेतील चार वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असावा.
- हेल्थ इकॉनॉमिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून हेल्थ इकॉनॉमिक्स / इकोनॉमिक्स / पब्लिक हेल्थ / कम्युनिटी मेडिसिन या शाखेमधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. हेल्थकेअर कॉस्टिंग, इकॉनोमिक व्हॅल्युएशन या विषयांमधून स्पेशलायझेशन केलेले असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे हेल्थ इकॉनॉमिक्स मध्ये काम केलेला दोन वर्षाचा अनुभव पाहिजे. संबंधित शाखेमधून उमेदवाराने पीएचडी मिळवलेली असावी. MS Office, VBA & Treeage यामध्ये उमेदवार पारंगत असावा.
- सिनियर रिसर्च ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. त्यासोबत उमेदवाराकडे पाच वर्षे काम केलेला अनुभव पाहिजे. किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डॉक्टर ऑफ फार्मसी उत्तीर्ण केलेली पाहिजे. किंवा उमेदवाराने संबंधित विषयांमधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
- रिसर्च ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून विज्ञान शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. उमेदवाराकडे चार वर्षे काम केलेला अनुभव पाहिजे. केव्हा उमेदवारांनी डॉक्टर ऑफ फार्मसी ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे गव्हर्मेंट डिपारमेंट, ऑटोनॉमस संस्था, विद्यापीठ, पब्लिक सेक्टर मधील संस्थान यामध्ये कमीत कमी तीन वर्षे काम केलेला अनुभव पाहिजे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MS Office , MS World, MS Power Point , MS Excel यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- फिल्ड इन्वेस्टीगेशन ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून विज्ञान विषयाची पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे तीन वर्षे काम केलेला अनुभव पाहिजे. किंवा उमेदवाराकडे संबंधित शाखेचे पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. किंवा उमेदवारांकडे ‘ डॉक्टर ऑफ फार्मसी’ ही पदवी असणे गरजेचे आहे.
- वैज्ञानिक – डी ( मेडिकल ) या पदाकरिता वय मर्यादा 45 वर्षापर्यंत आहे.
- वैज्ञानिक – डी ( नॉन मेडिकल ) या पदासाठी 45 वर्ष वय मर्यादा आहे.
- वैज्ञानिक – सी ( मेडिकल ) या पदाकरिता 40 वर्षे वय मर्यादा आहे.
- वैज्ञानिक – सी ( नॉन मेडिकल ) या पदाकरिता 40 वर्षे वय मर्यादा आहे.
- हेल्थ इकॉनॉमिस्ट या पदाकरिता 40 वर्षे वय मर्यादा आहे.
- सीनियर रिसर्च ऑफिसर या पदाकरिता वय मर्यादा 45 वर्षे आहे.
- रिसर्च ऑफिसर या पदासाठी 40 वर्षे वय मर्यादा आहे.
- ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. पण शासकीय कर्मचाऱ्यांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
- फिल्ड इन्वेस्टीगेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वय मर्यादा 35 वर्षापर्यंत आहे.
- सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता जाहिरातीत दिलेल्या ईमेल आयडी द्वारे उमेदवारांनी अर्ज करावा.
- afmchtarc@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ‘मुख्य अन्वेषक, एचटीए-आरसी, सामुदायिक औषध विभाग, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, सोलापूर रोड, पुणे 411 040 (महाराष्ट्र)’ या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
AFMC Pune Bharti 2024 | आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज येथील भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती द्वारे अर्ज करू शकतात.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करता येणार आहे. तर ऑफलाइन अर्ज करण्याकरिता जाहिरात मध्ये पत्ता देण्यात आलेला आहे.
- वरील AFMC Pune Bharti 2024 भरती करिता विविध पदांकरिता देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करावा.
- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज यांच्याद्वारे 20 ऑक्टोबर 2024. ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. उमेदवारांनी ती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील AFMC Pune Bharti 2024 भरती बाबत वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. उमेदवारांना संपूर्ण माहिती मिळण्याकरिता उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील AFMC Pune Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.