ICAR-IARI Bharti 2024 | भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत 03 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

ICAR-IARI Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ” ज्येष्ठ रिसर्च फेलो, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक ” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 28 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. भरती करिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज पाठवायचा आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरती करिता अधिकृत जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 03 रिक्त जागा भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्याकडून भरण्यात येणार आहेत.

     

  • ” ज्येष्ठ रिसर्च फेलो, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक ” या पदाकरिता योग्य उमेदवार भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

RITES लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी.

ICAR-IARI Bharti 2024 | भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • ज्येष्ठ रिसर्च फेलो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून जेनेटिक्स / प्लांट ब्रेडींग / जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग / बायो टेक्नॉलॉजी / लाइफ सायन्स सब्जेक्ट या विषयांमधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षाची बॅचलर पदवी आणि त्यानंतर दोन वर्ष पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NET परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांकडे मॉलिक्युलर मार्किंग, फिल्ड फेनो टायपिंग, हॅण्डलिंग राईस क्रॉप यामध्ये काम केलेला अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

     

  • वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पूर्णवेळ अभ्यासक्रमातून पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने तांदूळ पिकासंदर्भात आणि लॅब प्रक्रियेमध्ये काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.

     

  • सदरील ICAR-IARI Bharti 2024  भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असावे . भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येणार आहे.

     

  • सदरील ICAR-IARI Bharti 2024  भरती मधून भरली जाणारी पदे ही पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची नोकरीचा कार्यकाल 31 मार्च 2025 या तारखेपर्यंत असणार आहे. हा कार्यकाल कामानुसार वाढवण्यात किंवा कमी करण्यात येऊ शकतो.
  • ICAR-IARI Bharti 2024  सदरील पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना कायमस्वरूपी कामावर रुजू करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची हमी भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्यामार्फत देण्यात येत नाही.

     

ICAR-IARI Bharti 2024 
ICAR-IARI Bharti 2024
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता मुलाखत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती उमेदवाराला ई-मेल द्वारे देण्यात येईल.

     

  • मुलाखतीला येण्याची वेळ आणि मुलाखती संदर्भातील सूचना उमेदवाराला मुलाखतीच्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने देण्यात येतील.

     

  • जाहिरातीच्या शेवट देण्यात आलेला एप्लीकेशन फॉर्म उमेदवारांनी भरायचा आहे. सर्व स्कॅन केलेले सर्टिफिकेट उमेदवारांनी अर्जासोबत जोडायचे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अर्जामध्ये भरावाच्या गोष्टी, जन्मतारखेच्या दाखल्याची तारीख, ओरिजनल पदवी प्रमाणपत्र किंवा प्रोविजनल पदवी प्रमाणपत्र, सध्याचा काढलेला फोटो, अनुभवाचे असणारे प्रमाणपत्र या सर्व गोष्टी उमेदवारांनी ई-मेलद्वारे पोहोचवणे गरजेचे आहे. जॉइनिंग च्या वेळेस उमेदवारांनी सर्व ओरिजनल कागदपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे पाठवणे गरजेचे आहे.

     

  • ICAR-IARI Bharti 2024  भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ज्या उमेदवारांकडे आहेत आशा उमेदवारांना ऑनलाइन मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.

     

  • कोणत्याही प्रकारच्या दबाव तंत्राचा वापर करून पदावर नियुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.

     

  • मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराचा कोणताही नातेवाईक किंवा जवळचा मित्र जर भारतीय कृषी संशोधन संस्था या ठिकाणी काम करत असेल तर त्याचे संपूर्ण नाव आणि पदाचे नाव उमेदवारांनी अर्जामध्ये लिहायचे आहे.

     

  • अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी सेल्फ डिक्लेरेशन ची स्कॅन कॉपी ई-मेल द्वारे जमा करणे गरजेचे आहे.

     

  • सदरील ICAR-IARI Bharti 2024   भरती संदर्भात कोणत्याही कायदेशीर कारवाई करिता नवी दिल्ली कोर्ट या ठिकाणी यावे लागेल.
  • भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करता उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करावा.
  • rice.qualitylab@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ICAR-IARI Bharti 2024 | भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा ई-मेल आयडी उमेदवारांना जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे.

     

  • ऑनलाईन वेबसाईट द्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्याद्वारे देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारात द्वारे उमेदवारांनी अर्ज करू नयेत.

     

  • भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरतीसाठी करायच्या अर्जाचा नमुना जाहिरातीच्या शेवट देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी हा अर्ज व्यवस्थित स्वरूपात भरायचा आहे. यामध्ये कोणतीही चुकीची माहिती उमेदवारांनी लिहायची नाही. अर्ज करताना खडाखोड करू नये. अपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

     

  • 28 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले ई-मेल ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. त्यामुळे या तारखेपर्यंत सर्व उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज पाठवायचे आहेत.

     

  • सदरील ICAR-IARI Bharti 2024   भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर इच्छुक उमेदवारांनी भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर जाहिरात समजून घेतल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने ई-मेलद्वारे अर्ज करायला सुरुवात करावी.

ICAR-IARI Bharti 2024 | भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी सूचना खालीलप्रमाणे.

  • भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच मुलाखतीसाठी पात्र असणार आहेत. इतर कोणत्याही उमेदवारांना मुलाखतीला बसता येणार नाही.

     

  • भारतीय कृषी संशोधन संस्था येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या किंवा मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्याकडून TA / DA देण्यात येणार नाही.

     

  • भारतीय कृषी संशोधन संस्था या भरतीच्या प्रक्रियेमध्ये पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर अशा उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

     

  • सदरील ICAR-IARI Bharti 2024  भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.
  • ज्येष्ठ रिसर्च फेलो या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 31000 वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराला दरमहा 24% HRA मिळणार आहे.

     

  • वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 18000 रुपये वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना दरमहा 24% HRA मिळणार आहे.
  • भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
  • भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्या येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment