National Seed Corporation Bharti 2024 | राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथे 188 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

National Seed Corporation Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय बियाणे महामंडळ त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 188 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरच्या भरती मधून ” उपमहाव्यवस्थापक,  सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी ” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरती चे आयोजन करण्यात आलेले आहे. 30 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे आहेत. राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचून समजून घ्यायचे आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख वाचायचा आहे.

  • 188 जागा करण्याकरिता राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्याद्वारे भरती काढण्यात आलेली आहे.

     

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथील होणाऱ्या भरती मधून उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे भरती

National Seed Corporation Bharti 2024
National Seed Corporation Bharti 2024

National Seed Corporation Bharti 2024 | राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.

  • उपमहाव्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीए ( HR ) ही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. किंवा इंडस्ट्रियल रिलेशन या शाखेमधून डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. वैयक्तिक मॅनेजमेंट मधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा लेबर वेल्फेअर / एमएसडब्ल्यू / पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधून एम ए / प्रतिष्ठित विद्यापीठातून एलएलबी पदवी यापैकी कोणतीही पदवी 60% गुण ने उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10 वर्ष अधिकारी म्हणून शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमध्ये काम केलेला अनुभव असावा. त्यातील पाच वर्षे उमेदवाराने अधिकारी म्हणून शासनाच्या विविध खात्यामध्ये काम केलेले असावे. उमेदवाराने ज्या ठिकाणी काम केलेले आहे अशा ठिकाणी कमीत कमी 500 कामगार असणे गरजेचे आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे निरीक्षणाचे काम करण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. याबाबत उमेदवाराकडे दोन वर्षाचा अनुभव असावा. पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 50,000 ते 1,60000 वेतन मिळणार आहे. या पदाकरिता एक वर्ष प्रोबेशन पिरियड असणार आहे.

     

  • असिस्टंट मॅनेजर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेल्या एमबीए इन एच आर ही पदवी असावी. / अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पोस्ट ग्रॅज्युएशन दोन वर्षाचे पूर्ण असावे / उमेदवाराकडे डिप्लोमा इन रिलेशन इंडस्ट्रियल पदवी असावी / वैयक्तिक मॅनेजमेंट पदवी / लेबर वेलफेअर / एमएसडब्ल्यू यापैकी कोणतीही पदवी उमेदवाराकडे कमीत कमी 60% गुणांनी मिळवलेले असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव उमेदवारांनी शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमधून घेतलेला असावा. सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता दरमहा 30,000 ते 1 लाख 20 हजार रुपये वेतन असणार आहे.

     

  • मॅनेजमेंट ट्रेनी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून दोन वर्षाची पदव्युत्तर पदवी पूर्णवेळ अभ्यासक्रमातून उत्तीर्ण केलेली असावी / उमेदवाराने पर्सनल मॅनेजमेंट डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा / इंडस्ट्रियल रिलेशन संदर्भातील डिप्लोमा उत्तीर्ण असावा / लेबर वेलफेअर / या चार मॅनेजमेंट यांपैकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. सदरील पदवी 60% गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामध्ये MS OFFICE चे ज्ञान उमेदवाराकडे असावे.
  • ट्रेनि स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षाचा ऑफिस मॅनेजमेंट चा डिप्लोमा 60% गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे शासनाच्या संस्थेमधून स्टेनोग्राफी उत्तीर्ण केलेला प्रमाणपत्र असावे किंवा भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी आणि उमेदवाराकडे स्टेनोग्राफी चे प्रमाणपत्र असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असावे त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हिंदी भाषेचे ज्ञान असावे उमेदवाराकडे संभाषण कौशल्य चांगले असावे. 80 शब्द प्रतिमिनिट इंग्लिश आणि कॉम्प्युटर टायपिंग मध्ये सदरील वेगाची परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी. याकरिता ट्रेनिंग चा कालावधी एक वर्षाचा आहे तो पुढे जाऊन सहा महिन्याकरिता वाढवण्यात येणार आहे.
  • सदरील National Seed Corporation Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹500 असणार आहे. 26 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे. 30 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. 22 डिसेंबर 2024 हे परीक्षेची तारीख देण्यात आलेली आहे.

National Seed Corporation Bharti 2024 | राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथील National Seed Corporation Bharti 2024 भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सदरील संस्थे कडून देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुविधेद्वारे अर्ज करायचे आहेत.

     

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्याकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या अधिकृत पत्त्यावर ऑफलाइन पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून आपले अर्ज जमा करायचे नाहीत. असे केल्यास त्या उमेदवाराची अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

     

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना सर्व इच्छुक उमेदवारांनी मध्ये स्वतःची विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक लिहिणे गरजेचे आहे. चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवारांना सदरील भरती मध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याचप्रमाणे आशा उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत.

     

  • 30 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर कोणाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कारण ही सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रणाली बंद होणार आहे.

     

  • सदरील National Seed Corporation Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे. जाहिरात समजल्यानंतर उमेदवारांनी आवश्यक ती माहिती अर्जानुसार भरायची आहे.

National Seed Corporation Bharti 2024 | राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी साठी अर्ज केलेले आहेत असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र असणार आहेत. इतर कोणत्याही उमेदवाराला या भरतीमध्ये डायरेक्ट प्रवेश देण्यात येणार नाही.

     

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या भरती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्याकडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही त्याचे सर्व उमेदवारांनी काळजी घ्यावी.

     

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवारांनी अनुचित प्रकार करू नये केव्हा गैरप्रकार करू नये असे करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्या उमेदवाराचा अर्ज कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.

     

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेत स्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
  • National Seed Corporation Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी देण्यात आलेली शैक्षणिक पात्रता अर्ज भरायचा अंतिम दिनांक पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

     

  • अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे असणारे मार्कशीट सीजीपीए सिस्टीम प्रमाणे असेल तर अशा उमेदवारांचे मार्क टक्केवारी मध्ये तयार करावे लागतील. उमेदवाराचे टक्केवारी मध्ये मार्क करण्याकरिता विद्यापीठाने दिलेल्या नियमानुसार टक्केवारी काढण्यात येईल.

     

  • जर उमेदवार सध्या कोणत्या संस्थेमध्ये काम करत असेल तर उमेदवाराकडे त्या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

Leave a Comment